पुणे पदवीधरसाठी प्रा.डॉ.निलकंठ खंदारे अर्ज दाखल करणार | पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी माझी उमेदवारी

0



सांगोला : दि.1 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषद पुणे पदवीधर मतदारसंघात प्रा डॉ.निलकंठ खंदारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.डॉ.खंदारे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यमान सिनेट सदस्य तसेच वनस्पती शास्त्रात संशोधक आहेत.विद्यार्थी दशेपासून चळवळीत काम करत पुढे सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत काम केले आहे.शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या माध्यमातून अनेक आंदोलना मध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. 






ही पुणे पदवीधर विधानपरिषदेची निवडणूक आपण मुद्द्यांवर लढणार असून त्यात पदविधरांचे बेरोजगारी च्या संबंधीचे प्रश्न,तसेच ते स्वतः शिक्षक असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या समस्या, विना अनुदानीत,अंशतः अनुदानीत,आश्रमशाळांचे प्रश्न, नेट सेट, पीएच.डी, जुनीपेन्शन इत्यादी कळीच्या मुद्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात फार्मसी, मेडिकल,पॅरा मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्रात शिक्षकांना  वर्ष वर्ष पगार नसणे त्यांना फंड, ग्रॅच्युईटी न मिळणे, सेवशाश्वती नसणे ये मुद्दे देखील अधोरेखित केले आहेत.


Rate Card





कोणत्याही पदवीधर आमदारांनी हे प्रश्न विधिमंडळात मांडले नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे ते प्रश्न तसेच प्रलंबित आहेत.डॉ खंदारे यांना विविध 20 पेक्षा जास्त शैक्षणीक, सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा असून आपण स्वतः नेट सेट ग्रस्त असल्याने, जुनी पेन्शन, विनाअनुदानित च्या झळा आपण सोसल्या असून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व ताकत पणाला लावू त्यासाठी त्या सर्व घटकांनी एकत्र येऊन पुणे पदवीधर साठी पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.