विशेष | प्रकाश जमदाडे यांची केंद्रिय रेल्वे बोर्डाचे सोलापूर विभाग सदस्यपदी निवड

0
6





जत,प्रतिनिधी : जतमधील भाजपा नेते खा.संजयकाका पाटील‌ यांचे विश्वास प्रकाश जमदाडे यांची केंद्रीय रेल्वे बोर्ड सोलापूर विभागाच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.खा.संजयकाका पाटील यांनी खास बाब म्हणून तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांचेकडे पाठपुरावा केला होता.

सदरची निवड ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.







यापूर्वी 2 वर्ष प्रकाश जमदाडे हे पुणे विभागाचे सदस्य होते.परंतु सलगरे स्थानकापासून कवठेमहांकाळ,ढालगाव,जत रोड स्टेशन,सांगोला हे सोलापूर विभागाच्या अंतर्गत होते.या आपल्या भागातील रेल्वेच्या प्रवाशांची सोडवणूक करणेसाठी अडचणी येत होत्या म्हणून खा .संजयकाका यांनी खास बाब म्हणून पुणे विभाग बदलून जमदाडे यांवा सोलापूर विभागाचे सदस्य केले आहे.हे पद 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.







या विभाग अंतर्गत सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,बीड,विजापूर,गुलबर्गा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे विभागाचे सदस्य असताना मिरज,जत , विजापूर व विजापूर,उमदी,पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी जमदाडे यांनी रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेत हे रेल्वे मार्ग‌करावेत अशी मागणी करत,तसे निवेदन दिले होते.त्याशिवीय अनेक प्रवाशांची सोडवणूक करणेसाठी पाठपुरावा केला होता.निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






जत‌ येथील भाजपा नेते प्रकाश जमदाडे यांचा सत्कार करताना खा.संजयकाका पाटील,यावेळी बिळूर गटाचे पं.स.सदस्य रामाण्णा जिवाण्णावर,संरपच नागनगौडा पाटील आदी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here