जत नगरपरिषदेमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन

0



जत,प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जत शहरात विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन जत नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे. सदर स्पर्धा निशुल्क आहेत.कोरोनासारखा संसर्गजन्य रोग सद्यस्थितीत फोफावत असल्याने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन केले आहे. पोस्टर व चित्रकला,जिंगल, निबंध, शॉर्ट फिल्म स्पर्धा व भिंती चित्रे, पथनाट्य आदी स्पर्धांचे आयोजन केले आहेे.







स्पर्धेचे विषय : कचरा वर्गीकरण व संकलन,कचरा वर्गीकरण- ओला सुका,प्लास्टिक,घातक कचरा,घरगुती कचऱ्यावर प्रक्रिया,शून्य कचरा निर्मिती,कचऱ्र्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती,कचरा लाख मोलाचा,स्वच्छता विषयक उपाययोजना,कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना.,माझे कुटुंब माझी जबाबदारी हे आहेत. स्पर्धेमध्ये शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक,तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे. सदर स्पर्धा ही जत शहरातील नागरिकांसाठी मर्यादित आहे.








नागरिकांच्या कला, गुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांनी 15 नोव्हेंबरपर्यंत 2020 पर्यंत आपली कलाकृती नगरपरिषदेने दिलेल्या गुगल फॉर्म वर JPEG, PDF, AUDIO, VIDEO या फॉरमॅटमध्ये जोडावे. कलाकृती फाईलची साईज ही 100 MB पेक्षा जास्त नसावे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपले ई-मेल आयडी व ओळखपत्र कार्ड सोबतच्या फाईलमध्ये जोडणे बंधनकारक राहील.

Rate Card







स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांची नावे जत नगरपरिषदेच्या ऑफिशियल फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर अकाउंट वरून प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिली. 







Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.