जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिंगनहळळी येथे घरात ठेवलेल्या 18 हजार रूपये किंमतीचा 900 ग्रँम गांज्या जप्त केला.याप्रकरणी खंडू सुखदेव हिप्परकर,(रा.सिंगनहळ्ळी)याला ताब्यात घेतले आहे.जत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकांने हा छापा टाकला आहे.
अधिक माहिती अशी,जत तालुक्यातील गांज्यावर कारवाईची जत पोलीसांनी मोहिम उघडली आहे.त्या अनुषांगाने सिंगनहळ्ळी येथे खंडू हिप्परकर यांने घरात गांज्या ठेवल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीसांना मिळाली होती.त्याआधारे मंगळवारी रात्री उशिरा हिप्परकर याच्या घरावर छापा टाकण्यात आला.
त्यात हिप्परकर यांच्याकडे 900 ग्रँम 18 हजार रूपये किंमतीचा वाळलेल्या गांज्या साडीच्या कापडात बांधून ठेवलेला आढळून आला.त्याला ताब्यात घेत जत न्यायालया समोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.उपविभागीय पोलीस रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय अकुल, सुनील व्हनखंडे यांनी ही कारवाई केली.








