जत तालुक्यात बुधवारी 12 नवे रुग्ण सापडले : 9 रुग्णांना डिस्चार्ज | कोरोना नियंत्रणात

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. तालुक्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही.तर आज बुधवार दि.4 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पाच गावात 12 रुग्ण सापडले.गेल्या आठवड्यात नवे रुग्ण कमालीचे कमी झाले आहेत. आज बुधवारी तालुक्यातील 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.बुधवारी तालुक्यातील अनेक गावांत लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यातील जत 7,डफळापूर 2,माडग्याळ 1,कोळिगिरी 1,दरिबडची 1 अशा 12 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 


तालुक्यात आतापर्यंत 1752 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1597 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 59 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला 96 बाधित रुग्णापैंकी 76 रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये उपचार घेत आहेत.


Rate Card

 गेल्या 15 दिवसांत तालुक्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्या व मृत्यूदर कमालीचा घटला आहे. तालुक्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. प्रशासनाचे नेटके नियोजन आणि नागरिकांनी प्रशासनाला दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले आहे.

कोरोनाची साथ आटोक्यात येत असली तरी युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.


त्यामुळे आपल्या देशातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी निष्काळजीपणाने वागू नये. सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा योग्य वापर करावा. कोणीही अंगावर दुखणे काढू नये. कोरोनाची कोणतीही लक्षणे वाटली तरी तात्काळ दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.