काळ्या बाजारात जाणाऱ्या ‘रेशन’ च्या धान्याचा टेम्पो जप्त | बिळूरमध्ये कारवाई | गरिबाच्या धान्याची तस्करी करणाऱ्या टोळी खणून काढण्याचे महसूलसमोर आवाहन

0





जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानातील धान्ये गरिबाच्या तोंडातील घास हिसावून खुल्या बाजारात तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात जत महसूल विभागाला यश आले असून बिळूर येथून सुमारे 29 पोती तांदुळ,9 पोती गहू भरलेला टेम्पो(एमएच-10,एक्यू 7405)जप्त करत मोठी कारवाई केली आहे.याप्रकरणी संशयित महादेव कोळी यांच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.संशय असणाऱ्या बिळूर येथील 6 स्वस्तधान्य दुकानांतील स्टॉकची तपासणी तहसीलदार सचिन पाटील यांनी स्व:ता घेतली आहे.






Rate Card



बिळूर येथील गावापासून काही अंतरावरील शेतात स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ,गहू जवळपास 38 पोती धान्य भरलेल्या टेम्पो उभा असल्याची माहिती जतचे मंडल अधिकारी संदिप मोरे यांना मिळाली होती.त्या आधारे त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला असता शासनाकडून गरिबांना वाटपासाठी असणारा 29 पोती तांदुळ,9 पोती गहू आढळून आला.टेम्पोसह मुद्देमाल जप्त करत ताब्यात घेण्यात आला आहे.टेम्पोचा चालक महादेव कोळी हा पळून गेला आहे.







दरम्यान या छापाची माहिती मिळताच‌ तहसीलदार सचिन पाटील यांनी बिळूरमध्ये पोहचत सहा दुकानाचे स्टॉक रजिस्टरची तपासणी करून धान्य स्टॉकचा‌ अहवाल घेतला आहे.नेमके हे धान्य कोठून आले,यांची तपासणी सुरू आहेत.यामुळे जत तालुक्यात गरिबाच्या धान्यावर डल्ला मारून गब्बर झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांचा भांडाफोड‌ होणार आहे.त्याशिवाय तालुक्यात अशा धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या मोठे रँकेट समोर येण्याची शक्यता आहे.



ग्रामीण खेड्यात नियमांची पायमल्ली करून बेभाव विक्री 

शासनाच्या वतीने दर निश्चित करून पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरणा करिता रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वाटप करण्याचे निर्धारित आहे. परंतु सदर धान्याची ग्रामीण खेड्यात नियमांची पायमल्ली करून बेभाव विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची बोंब शिधापत्रिकाधारक करीत आहेत.






पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांना प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शासकीय दरपत्रक परिपत्रकासह प्रसिद्धीसाठी पाठविल्या जाते व प्रत्येक गावातील गावकऱ्यांना योजनानिहाय धान्य पुरवठ्याच्या तपशिलाचे परिपत्रक प्रसिद्धीस द्यायचा असते, असे शासकीय संकेत आहेत.








काळ्या बाजारात तस्करी होणाऱ्या धान्याचा तस्करी पाळेमुळे खणऩ्याचे आवाहन


स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बिळूर प्रकरणामुळे उघडकीस आला आहे़.जत‌ तालुक्यातील रेशन दुकानातील माल शिधापत्रिकाधारकांना मिळण्याऐवजी इतर ग्राहकांना काळ्या बाजाराने विकला जात आहे़ दुकानदारांनी कार्डधारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे केले असून, कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आधार कार्ड नसले, तरी त्या व्यक्तीला रेशनिंगवरील माल देण्यास नकार दिला जातो. आधारकार्ड नसल्याने वाटप न केलेला माल काळ्या बाजाराने विकला जात असल्याची बाब निदर्शनास आली. ऐन सणासुदीच्या काळात गरिबांच्या तोंडचा घास काढण्याचे काम दुकानदार करीत आहेत.






Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.