जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिंदूर ता.जत येथे जत पोलीसांनी छापा टाकत 51 लाख रुपयाचा 520 किलो ओला गांजा जप्त केला.याप्रकरणी बसाप्पा खुशाबा आक्कीबाट रा. सिंदूर, ता.जत याला ताब्यात घेतले आहे.
आज दि. ०२.११.२०२० रोजी उत्तम जाधव पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती.
सिंदूर येथील बसाप्पा खुशाबा आक्कीबाट याने त्याचे हळदीचे पिकात गांजाची लागवड करून जोपासना करीत असलेची खात्रीशीर बातमी मिळालने सदर बातमीच्या आधारे दोन शासकीय पंचासमक्ष तसेच पोलीस स्टाफसह बसाया खुशाबा आक्कीवाट याचे सिंदूर गावचे हद्दीतील जमीन गट नं.४२८ मध्ये असलेल्या हळदीचे पिकात छापा टाकला.
गांजाची ५ ते ६ फुट उंचीची झाडे मिळून आले. मिळून आलेल्या गांजाचे झाडाचे बजन केले असता ते ५२० किलो भरले. सदर छाप्यामध्ये ५१,९३,३००/- रूपये किंमतीची गांजाची झाडे वाढविलेल्या स्थितीत मिळून आली आहेत. सदर ठिकाणी मिळून आले गांजाची झाडे सविस्तर पंचनाम्याने जप्त करून ताव्यात घेतली असून सदरचावत जत पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बसाप्पा खुशाया
आक्कीवाट रा. सिंदूर, ता. जत, जि. सांगली यास ताव्यात घेतले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास हा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत श्री.रत्नाकर नवले सो यांचे मार्गदर्शनाखाली उत्तम जाधव पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक, सांगली दीक्षीत गेडाम,अप्पर पोलीस अधिक्षक, सांगली मनिषा दुबुले,उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत रत्नाकर नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सपोनि मोहीते, पोहेकॉ/२१८ जौंजाळ, पोहेकॉ/२८६ वीर, पोना/१६४६ हाके, पोना/१४६७
थोरात,पोना/११९५ मासाळ, पोना/१३२७ चव्हाण, पोना/१४४२ चव्हाण, पोना/३८ फकीर,मपोना/१८१३ मुजावर, पोकॉ/११३५ शिंदे, पोकॉ/१६५० खोत, पोकॉ/२४३२ माळी, अशांनी पार पाडली.
जत पोलीस ठाणे हद्दीतील अशा प्रकारच्या अवैदय कृत्याविषयी कोणास माहीती असल्यास त्यांनी सदरची माहीती पोलीस ठाणेस दयावी. माहीती देणान्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल,असे आवाहन करण्यात आले आहे.










