कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी बाजीराव प्रज्ञावंत यांची फेरनिवड

0
7



सोन्याळ,वार्ताहर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी बाजीराव प्रज्ञावंत यांची फेरनिवड करण्यात आली. यानिमित्ताने त्यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आले.शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ वाढीसाठी सांगली जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांच्या निवडीचे आदेश राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे साहेब यांनी नुकतेच दिले. 







या निवडीनंतर राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी व शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, जिल्हा सचिव बाबासाहेब माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिक्षक संघटना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे, सचिव विद्याधर रास्ते, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे, महिला आघाडी प्रमुख सौ. विनोदिनी मिरजकर,संघटक सचिव अशोक हेळवी, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सचिव रमेश सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी जोशी आदित्य तिरमारे,आदी  उपस्थित होते.









बाजीराव प्रज्ञावंत यांचा सत्कार करताना वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here