कवठेमहांकाळ एस.टी.आगार व्यवस्थापकास लाच घेताना अटक

0



कवटेमहांकाळ : कवठेमहांकाळ एस.टी.आगार व्यवस्थापक स्वप्नील लालासाहेब पाटील, वय.30, यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

याबाबत हकीकत अशी की तक्रारदार यांची चौकशी विभागीय कार्यालय,सांगली याठिकाणी सुरु आहे. सदर चौकशीमध्ये तक्रारदार यांची दोन वर्षाचे वेतनवाढ रोखण्याचे शिक्षेचा रिपोर्ट न पाठवीता त्याऐवजी सहा महीने अल्प परिणामी वेतनवाढ रोखण्याची शिक्षा मिळणेबाबतचा रिपोर्ट विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ, सांगली या ठिकाणी पाठवितो असे सांगून पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रूपये लाचेची मागणी केली. 



त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्यामध्ये पाटील, यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

Rate Card

शनिवारी कवठेमहांकाळ एस.टी. स्टॅन्ड येथील आगार प्रमुख यांचे शासकीय बंगला येथे सापळा लावून स्वप्नील लालासाहेब पाटील, यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारले असताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुध्द कवठेमहंकाळ पोटी स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले पोलीस अंमलदार अविनाश सागर, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, सलीम मकानदार, प्रितम चौगुले, राधिका माने, विणा जाधव चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.