जत,प्रतिनिधी : भाजपचे युवा नेते तथा नगरसेवक उमेश सांवत यांनी
जत-गुहागर महामार्गावर आलेल्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सर्पाला जिवदान देत नैसर्गिक आदीवासात सोडले.
सांवत व त्याचे मित्र संतोष मोटे,नगरसेवक प्रकाश माने,आण्णा भिसे,प्रमोद सांवत,बाळ सांवत,अमिर शेख हे एका कार्यक्रमानिमित्त जतहून गुहागर महामार्गाने निघाले होते.तिप्पेहळी नजिकच्या हवलदार वस्ती जवळ सांवत यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुर्मिळ जातीचा मांडूळ सर्प रस्ता ओलांडत असताना दिसताच सांवत यांनी गाडी थांबविली.
तत्पुर्वी नगरपरिषदेचे कर्मचारी नारायण मिस्त्री हे दुचाकी आडवी लावून मदत करत होते.वाहनाची मोठी ये-जा होती.त्यामुळे संथपणे जाणाऱ्या मांडूळ एकाद्या गाडीखाली जाण्याची शक्यता होती.प्रंसगावधान राखत सांवत यांनी या सर्पास उचलून नैसर्गिक आदीवास असणाऱ्या झुडपात सुरक्षितपणे सोडले.यापुर्वीही सांवत यांनी सांगली रोडवर मोराच्या शिकाऱ्यांना पकडून कारवाई करण्यास वनविभागास भाग पाडले होते.
परिणामी तेव्हापासून दुर्मिळ वन्य प्राण्याची शिकारीचे प्रमाण घटले आहे.अशा कतृव्यदक्ष जागृत्त लोकप्रितिनिधीमुळे शिकाऱ्यांना मोठा चाफ बसला आहे.शनिवारीही सांवत यांनी रस्ता ओंलाडणाऱ्या मांडूळ सर्पास एकप्रकारे जीवदान दिले.महामार्गावर भरधाव मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या एकाद्या गाडीच्या चाकाखाली जाऊन हा सर्प मृत्त झाला असता.
जत-गुहागर मार्गावर आलेल्या दुर्मिळ मांडूळ सर्पास उमेश सांवत यांनी उचलून नैसर्गिक आदीवासात सोडून दिले.








