प्राथमिक शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करा ; शिक्षक भारतीची मागणी
जत,प्रतिनिधी : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार 1 तारखेला करण्यात यावेत,असा शासन निर्णय असताना ही राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार 1 तारखेला होत नाहीत.शिक्षकांचे पगार वीस दिवस उशिरा होत आहेत.शिक्षकांचे पगार उशिरा होत असल्याने शिक्षक बँक,पतसंस्था यांची कर्जावर व्याजाचा बूर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शिक्षकांचे पगार व्हावेत,अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पगार करण्याची प्रक्रिया जिल्हास्तर,पंचायत समिती, केंद्रस्तर अशी असल्याने पगार वेळेत होत नाहीत.यासंदर्भात शिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात यावेत.1 तारखेला पगार अदा न होणारे जिल्हे शाळा माहिती घेऊन विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शालेय शिक्षण विभागाच्या 2 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाने कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या पगारासंदर्भात सीएमपी प्रणाली राबविण्यात यावी,अशी मागणी सहसंचालक यांच्याकडे करण्यात आली.त्यावेळी सहसंचालक दिनकर टेमकर यांनी लवकर सी एम पी प्रणाली राज्यात सुरू करू असे सांगितले.यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, कृष्णा पोळ, सुरेश खारखांडे, दिगंबर सावंत, नंदकुमार पाटील इ. पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करा या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आले.