माडग्याळ मधील शेळ्या-मेंढ्या,जनावरे बाजारास प्रारंभ

0
4



माडग्याळ,वार्ताहर : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भरविण्यात येत असलेला माडग्याळ ता जत येथील प्रसिध्द शेळी-मेंढी,जनावरे बाजारास प्रांरभ झाला आहे.आज शुक्रवार पासून पुर्वरत बाजार सुरू राहणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार बंद‌करण्यात आला होता.

तब्बल सात महिन्यानंतर सुरू झालेल्या बाजाराला गत आठवड्यापासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.







माडग्याळ परिसरातील जातिवंत माडग्याळी मेंढी,शेळ्या महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलगांणा या राज्यात मोठी मागणी आहे.कोरोनाच्या‌ लॉकडाऊन काळात ता.21 मार्चपासून हा बाजार बंद ठेवण्यात आला होता.त्यामुळे सुमारे सव्वा कोटीची उलाढाल थांबली होती.परिणामी पशुपालन व्यवसाय अडचणीत आला होता.शैळ्या‌,मेंढ्याचे दर कमालीचे उतरले होते.आता बाजार सुरू झाल्याने योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here