बेवनूर-घोरपडी,शेगाव-चपरासवाडी रस्त्यांना मान्यता ; स्नेहलता जाधव यांची माहिती | आश्वासनाची पुर्ती

0जत,प्रतिनिधी : शेगाव मतदार संघातील बेवनूर ते घोरपडी,शेगाव ते चपरासवाडी या दोन रस्त्याच्या कामांना ग्रामसडक योजनेतून निधी मिळाला असून लवकरचं कामास सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलता प्रभाकर जाधव यांनी दिली.


गेल्या दहा वर्षापासून या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची मागणी होती.सौ.जाधव यांनी जि.प.निवडणूकीत ते दोन रस्ते मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.त्यापासून गेले तीन वर्ष त्या कामाचा पाठपुरावा जिल्हा नियोजन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला होता.

तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख  आमदार विलासराव जगताप यांच्या शिफारशीने या कामाला 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती.आता त्यांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच कामास सुरूवात होणार आहे.त्यामुळे या भागाचे दळवळण वाढणार आहे.या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.

Rate Card

आणखीन तीन रस्त्यांना प्रशासकीय मान्यताशेगाव मतदार संघात खा.संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्या स्नेहलात प्रभाकर जाधव यांच्या पाठपुराव्याने आणखीन तीन रस्त्यांना पंतप्रधान सडक योजनेअतर्गंत अंदाजे 8 कोटीच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.त्यामध्ये कुंभारी ते बाज,प्रतापपूर ते कोसारी,डोंगरगाव ते सिंगनहळ्ळी-अंतराळ या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.