जतच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक

0
11



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुका प्रशासनाने गंभीर होत शेतकऱ्यांना मदत करावी,अन्यथा स्वा.शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा तालुका शाखेच्या वतीने निवेदानाद्वारे दिला आहे.








निवेदनात म्हटले आहे.तालुक्यात परतीच्या पावसाने (अतिवृष्टीने) झालेल्या फळबागेसह सर्वच पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी,तालुक्यात बाजार समिती व महसुल विभागामध्ये चालु असलेल्या भोंगळ कारभार तातडीने सुधारावा,तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असून अगोदर दुष्काळ व अतिवृष्ठीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. नुकसान ग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, आलेल्या पिकांना योग्य दर मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घागरे,तालुकाध्यक्ष रमेश माळी,तुकाराम गावडे यांच्या‌ नेतृत्वाखाली हे‌ निवेदन देण्यात आले आहे.








सुरेश घागरे‌ म्हणाले,तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले असताना कृषी विभागाचे विभागीय अधिकारी,तालुकाधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करत आहेत.अनेक गावात त्यांनी वेगवेगळे नियम लावून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे टाळण़्याचे प्रकार केले आहेत.








कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.त्याशिवाय हाताखाली काम करणारे कर्मचारी शेतकऱ्यांच्याकडे पैशाची मागणी करत आहेत.हा प्रकार निंदनीय आहे.यात ‌सुधारणा करावी अन्यथा कृषी कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा सुरेश घागरे यांनी दिला आहे.








जत‌ तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देताना स्वा.शेतकरी संघटनेचे नेते

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here