महाराष्ट्रात प्रथमच तालमीत वाचनालय | कुस्ती आखाड्यात वाचनालय ही काळाची गरज – तहसिलदार गणेश शिंदे.

0शिराळा : कुस्ती हा फक्त खेळ नाही तर सशक्त, सुसंस्कृत पिढी घडवणारे आणि प्रचंड आत्मिक ऊर्जा देणारे दालन असल्याचे मत तहसीलदार गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.शेडगेवाडी ता. शिराळा येथील कुस्ती मल्लविद्या केंद्रामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू होणाऱ्या तालमीतील वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कुस्ती मल्ल विद्या महासंघाचे जिल्हा प्रवक्ते विनायक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य अंतर्गत कुस्ती मल्लविद्या केंद्रात वाचनालयाचे उद्घाटन तहसीलदार गणेश शिंदे, विश्वास साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम, ज्येष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस, साई ऍग्रो टुरिझमचे गौरव इंगवले, टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष प्रमोद पवार या मान्यवरांच्या हस्ते झाले. विनायक गायकवाड यांनी आपल्या  वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून मल्लविद्या कुस्ती केंद्रातील या नव्या वाचनालयास 55 पुस्तकांचे वाटप केले.


Rate Card
शेडगेवाडी ता. शिराळा येथील तालमीत महाराष्ट्रातील पहिल्या वाचनालयाचे उद्घाटन करताना तहसीलदार गणेश शिंदे, विनायक गायकवाड व इतर मान्यवर.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.