विजापूर-गुहागर महामार्गाकडचे अतिक्रमणे हटवा

0
8



जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्ग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमणे हटवून त्यांचे पुर्नवसन करावे,अशी मागणी वचिंत बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,जत शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या विजापूर-गुहागर महामार्गावर दुफर्ता खोक्याचे सामाज्र बनले आहे.






त्याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातही अनेकांनी बेकायदा पक्की घरे बांधून अतिक्रमण केले आहे.ते तातडीने हटवून त्यांचे पुर्नवसन करावे, असे निवेदनात म्हटले आहे. तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले.







विजापूर-गुहागर महामार्गाकडेचे अतिक्रम काढावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here