मणके निकामी,कधी करणार रस्ते दुरूस्ती | सर्वच रस्त्याची पुर्ती वाट : अनेक रस्त्यावर पावलागणिक खड्डे

0जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच रस्त्याची चाळणी झाली आहे.खड्ड्यातून प्रवास करून मणके निकामी होण्याची वेळ आली आहे. पावस थांबला आहे.आतातरी रस्ते दुरूस्त करा,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 रस्ते उखडल्याने शेकडो ठिकाणी खड्डे पडले आहेत. पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.नगरपरिषेदेचे शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले जूने व नवे सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.काही रस्ते वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण वाहून गेले आहे,तेथे गुडघ्याऐवढे खड्डे पडले आहेत. 


उमदी- विजापूर, डफळापूर-अंनतपूर,डफळापूर-जत असे प्रमुख मार्गावर डांबरीकरण शोधण्याची वेळ आली आहे.इतके खड्डे पडले आहेत.अशा अनेक मुख्य रस्ते पावलाच्या अंतराला उखडेलेले आहेत. जास्त रहदरी असल्याने रस्ता अल्पावधीतच खराब झाला. दरम्यानच्या काळात स्थानिक प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले; पण दोन-चार महिन्यांतच जवळपास सर्वच रस्ते खराब झाले आहेत. सद्य:स्थितीत रस्ते खड्ड्यात गेल्याचे परिस्थिती आहे. खड्डे व खडीमुळे वाहनधारकांना आदळ-आपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. 


Rate Card


लवकर रस्ते दुरूस्त करावेत
शहरासह तालुक्यातील रस्त्याची वाईट अवस्था असून, रस्ते उखडले आहे.अंतर्गत, सर्व मुख्य रस्ते खराब झाल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही त्रास होत आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्ते लवकरात लवकर दुरूस्त करावेत; अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील.मणक्यांचा त्रास

मागणी करूनही रस्ते दुरुस्त केला जात नाही.नागरिकांना खड्ड्यांतून ये-जा करावी लागत असल्याने अनेक दुचाकीस्वारांना मणक्यांचे आजार जडले आहेत.


जत तालुक्यातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांना मरणकळा देत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.