पुर्व भागातील योजनेसाठी पुढील आठवड्यात बैठक ; अँड.चन्नाप्पा होर्तीकर | वंचित गावांतील लोकप्रितिनिधी,शेतकरी उपस्थित राहणार

0बालगांव,वार्ताहर : जत पूर्व भागातील म्हैसाळ योजने पासून वंचित असलेल्या गावांना जलसंपदामंत्री जयंत पाटील हे लवकरच म्हैसाळ योजनेत समाविष्ट करून जत पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवतील.त्याअनुषंगाने वंचित गावातील लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात  बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अँड.चन्नाप्पाणा होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


यावेळी होर्तीकर म्हणाले की,जत पुर्व भागातील म्हैसाळ योजने पासून वंचित असलेल्या जत पूर्व भागातील प्रत्येक गावातील प्रतिनिधीनी सांगली येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत पुढील आठवड्यात जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी यांच्या सोबत पूर्व भागातील लोकप्रतिनिधींचे बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.Rate Card

स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न होते की जत तालुक्यातील प्रत्येक गावात पाणी गेले पाहिजे,जत तालुक्याचे नंदनवन झाले पाहिजे,ते स्वप्न मी होर्तीकरच्या घरापर्यंत पाणी सोडून सत्यात उतरवणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री पाटील यांनी जत पुर्व भागातील लोकप्रतिनिधी ना दिली असल्याची माहिती अँड. होर्तीकर यांनी दिली.

यावेळी तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, सरपंच राजु पाटील,उपसरपंच बाबु नागौड,शिवलिंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


उमदी : जत पुर्व भागातील पाणी योजनेबाबत मंत्री जयंत पाटील यांना माहिती देताना अँड.होर्तीकर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.