उमराणी,एंकुडी,बिळूरमध्येविविध विकास कामांचे उद्घाटन
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाच्छापूर,देवनाळ,मेंढीगिरी उमराणी,बिळूर,गुगवाड,एंकूडी येथे जिल्हा नियोजन, पंचायत समिती,आमदार फंडातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमीपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.
त्यामध्ये पाच्छापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या 6 नवीन खोल्या बाधणे,नूतन व्यायाम शाळा बांधणे,देवनाळ येथे देवनाळ पाच्छापूर रस्ता ते बिराजदार वस्ती खडीकरण करणे,मेंढीगेरी येथे मेंढीगेरी डोंनपिर रस्ता सीडीवर्क,गावठाण ते कोळी वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे,उमराणी येथे सरसेनापती प्रतापसिंह गुजर स्मारक सुशोभीकरण करणे,बिळूर येथे गुरुबसवेश्वर विरक्त मठ येथे पेव्हींग ब्लॉक,गुगवाड येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे,गुगवाड सामाजिक सभागृहात बांधणे,एकुंडी येथे सामाजिक सभागृहत बांधणे,त्या सर्व कामाचे भूमिपूजन आमदार सावंत यांच्याहस्ते झाले.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,जिल्हा परिषद सदस्या कलावती कौरगोंड,जत मार्केट कमिटी माजी सभापती अभिजित चव्हाण,माजी पं स.सदस्य मलेश कत्ती,पं स.सदस्य दिग्विजय चव्हाण,अमर इंगोले,काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे,शाखा अभियंता श्री.शेख,विद्यानंद भोसले,महेश कोळी,माजी संचालक बाबा पाटील,श्रीशैल पाटील,हणमंत घेज्जी विठ्ठल धोडमनी,

मागसुली,सांगू पाटील,आबासाहेब पाटील,माजी सरपंच गांगप्पा कोकणे,बसवराज घेज्जी,राजू अंदानी,राजू पाटील, शिवलिंग कोकणे,शंकर कांबळे,गिरामला अंदानी,बसू अंदानी,महादेव कुंभार,महादेव जत्ती, गोपाळ एनगची,गरुषांत हिरेमठ,सलीम मुजावर,श्रीशैल वाघमोडे,इलाई मुल्ला,हणीप मिरजकर,महेश पाटील,बसगोंडा नाईक,सरपंच बसवराज पाटील,श्रीमंत गुदोडगी,मालगोडा हेलकर, गोपाळ म्हत्रे,पिंटू नाईक,श्री.नाईक,संरपच बसवराज पाटील,गावचे सरपंच,ग्रामसेवक,तलाठी पदाधिकारी उपस्थित होते.
एंकूडी ता.जत येथे सभागृह बांधकामाचे उद्घाटन करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर