माजी प्राचार्याच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न | जत शहरातील प्रकार ; प्राचार्य जखमी,पत्नीचे दागिणे पळविले

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील मोरे कॉलनी परिसरात रहाणाऱ्या सेवानिवृत्त प्राचार्यास मारहाण करून सोने लुटत सशस्ञ दरोडा टाकण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला आहे‌.मात्र प्राचार्याच्या पत्नीच्या गळ्यातील हिसका दिल्यानंतर तुटलेला मंगळसुत्राचा काही भाग चोरट्यांनी पळवून नेहला आहे.दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सेवा निवृत्त प्राचार्य शिवाजीराव मारूती भिसले हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी पोलीसांनी अनओळखी चौघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


अधिक माहिती अशी,जत शहरातील संभाजी नगरच्या मोरे कॉलनी येथे सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव भिसले आपल्या पत्नी शारदा यांच्यासह राहतात.मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन-चार दरोडेखोर घराचा दरवाज्या उचकटून आतमध्ये प्रवेश केला.भोसले दांपत्य आवाजाने जागे झाले.तेवढ्यात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत पत्नी शारदा यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसका देऊन तोडण्याचा प्रयत्न केला.Rate Card

प्रंसगावधान राखत शिवाजीराव भिसले यांनी दरोडेखोरांच्या हातातील चाकू हिसवून घेण्याचा प्रयत्न केला व आरडा ओराडा केल्यांने शारदा यांच्या गळ्यातील मंगळसुत्राचा काही भाग घेऊन दरोडेखांनी पळा काढला.दरम्यान दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत शिवाजीराव भिसले हे जखमी झाले आहेत.आरडा ओरड्यानंतर गोळा झालेल्या शेजाऱ्यांनी पोलीसांना यांची माहिती देताच पोलीसाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचत दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.


दरम्यान घटनास्थळी डॉग पथकांने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला,मात्र ते‌ काही अंतरावर घुटमळे.स्थानिक गुन्हे शाखा,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथके संशयित दरोडेखोरांचा शोध घेत‌ आहेत. प्रभारी डिवायएसपी किर्ती शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत.दरम्यान पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.जत तालुक्यात कायद्या सुव्यस्थेचे तीनतेरा वाजले असून पोलीसांचे नियंत्रण सुटल्याचे आरोप होत आहेत.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.