विजापूर-गुहागर मार्गावर वाहतूक कोंडी

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील गुहाघर-विजापूर मार्गावर जीवघेणी वाहतूक होत आहे.मार्गाचे काम करण्यासाठी दोन्ही बाजू खोदण्यात आल्या आहेत.त्यातच गटारीची कामे यामुळे रस्ता धोकादायक ठरत आहे.

जत शहरातील शेगाव ते चडचण येथे पर्यतच्या मार्गाचे काम सुरू आहे.त्यापैंकी शेगाव चौक ते निगडी कॉर्नरपर्यतचे दोन्ही बाजूचे सीमेंट कॉक्रीटकरण पुर्ण करण्यात आले आहे.गटारीही पुर्ण होत आल्या आहेत.मात्र गटारीपर्यत रस्ता भरण्यात आलेला नाही.तेथून पुढे एसटी स्टँडपर्यतचे मजबूतीकरणासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. तर तेथून पुढे चडचडण कॉर्नर पर्यतचे एका बाजूचे काम पुर्ण करण्यात आले आहे. तर त्याच बाजूच्या गटारीचे काम सुरू आहे.त्यामुळे एकेरी मार्ग सुरू आहे.त्याच मार्गावर दुचाकी,चार चाकी गाड्या उभ्या केल्या जात असल्याने अवजड वाहने सातत्याने अडकून प्रत्येक पंधरा मिनीटाला वाहतूक कोंडी होत.यात कुणाचा जीव कधी जाईल हे सांगता येत नाही.Rate Card


रस्त्याचे काम पुर्ण होईपर्यत येथे वाहतूक पोलीसांची नेमणूक करावी, ठेकेदार कंपनीकडून वाहतूक कोंडी लक्षात घेऊन गतीने काम करून रस्ता खुला करावा.रस्त्यावर उभ्या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जत शहरातील मार्केट कमिटीसमोर एक वाहन रस्त्यात उभे केल्याने दुर्फाता मोठी गर्दी झाली होती.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.