डफळापूर-अंनतपूर रस्त्यावर गुडघ्याऐवढे खड्डे

0डफळापूर, वार्ताहर : डफळापूर-अंनतपूर या आंतरराज्यीय रस्त्यावर गुडघ्याऐवढे खड्डे पडले असून दररोज पाच-सहा अवजड वाहने यात अडकत असून एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाही एतकी भयानक स्थिती या रस्त्याची झाली आहे.
डफळापूर पासून अंनतपूरमार्गे कर्नाटकला जोडणारा हा 14 किलोमीटरचा रस्ता कायम खड्डेमय असतोच.गेल्या पंधरवड्यात झालेल्या धुँवाधार पावसामुळे जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भष्ट्र,निकृष्ट रस्ते कामाचे पाप उघड झाले आहे.इतका रस्ता खराब झाला आहे कि साधे पायी चालणेही मरणयातना ठरत आहेत.लहान वाहने या रस्त्यावर जाऊच शकत नाही.अशी भयवाह स्थिती जत,डफळापूरातील ठेकेदार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कृत्वृवान अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीमुळे झाली आहे.आतापर्यत सुमारे दहा वेळा या रस्त्याची ठिगळे लावण्याची दुरूस्ती झाली आहे.पैसे मिळविण्याचा एकमेव कार्यक्रम ठेकेदार व अधिकाऱ्यांनी केल्याचे गंभीर आरोप या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी केला आहे.Rate Card


गुडघ्याभर खड्ड्यात नागरिकांनी टाकले दगड


गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर गुडघ्याऐवढे खड्डे पडले आहेत.यातूनच अवजड वाहतूक सुरू आहे.त्यामुळे रास्ता दररोज एक फुटाने दबत आहे.अधिकाऱ्यांना पाकिट दिल्यामुळे एका मोबाइल कंपनीची फाइबर केबल टाकण्यासाठी थेट रस्ता खोदून कुमकवत करण्यात आला आहे. सध्या मध्यभाग मोठ्या प्रमाणात दबल्याने मोठी वाहनेच जाऊ शकत आहेत.एकाचवेळी दोन्ही बाजूनी वाहने आली तर एक वाहन अडकणे निश्चित आहे.अशी दररोज चार-पाच वाहने अडकून राहत असल्याने रस्ता बंद होत आहे.गेल्या काही दिवसात खड्डे जास्तच पडल्याने काही नागरिकांनी खड्ड्यात दगडे टाकून काही प्रमाणात जाण्या-येण्याचा मार्ग तयार केला आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.