खाजगी सावकारकी बळावली | पुर्व भागात जमिनी बळकावण्याचे प्रकार ; पोलीसांनी लक्ष देण्याची गरज

0



जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील खासगी सावकारांकडून कर्जदारांना रात्री, अपरात्री मोबाईलवरून कर्ज परतफेडीसाठी धमक्या येऊ लागल्याने या सावकारांकडून कर्ज घेतलेले कर्जदार भयभीत झाले असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा सावकारांना शोधून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कर्जदारांकडून होत आहे.

जत तालुक्यातील गावोगावी प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसेलेले खासगी सावकारांचा उत आला आहे. हे खासगी सावकार अडल्या नडलेलेल्यांना मदत करण्याच्या नावाखाली गोरगरिबांना व्याजाने पैशाचा पुरवठा करित आहे. त्यासाठी त्यांनी एजंट लोकांची नेमणूक ही केली आहे. हे एजंट लोक पैशाअभावी अडलेले लोक हेरून त्यांना गोड बोलून खासगी सावकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करित आहेत. 








अशा अडल्या नडलेलेल्यांना या सावकारांकडून शेकडा पाच ते दहा टक्के व्याजाने कर्ज देऊन या कर्जाला तारण म्हणून हे खासगी सावकार या अशिक्षीत व लाचार कर्जदारांकडून त्यांच्या जमिनी आपल्या स्वताच्या नावावर न करता मध्यस्थी माणसाच्या नावावर करून या मध्यस्थामार्फत कर्जाचे व्याज वसुल करण्याचे काम करित आहेत. 

तालुक्यात व्याजाने पैसे देणारे खासगी सावकारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या सावकारांनी आपल्याकडून कर्जदारानी घेतलेले कर्ज व व्याजाच्या वसुलीसाठी गुंड पाळले आहेत हे गुंड कर्जदार लोकांना आडरस्त्यात गाठून त्यांना धमकी देणे, मारहाण करणे, त्यांची जनावरे ताब्यात घेणे, कर्जदारांची वाहने जबरदस्तीने ओढून नेणे, कर्जदारांना रात्री अपरात्री मोबाईलवरून कर्ज परतफेडीसाठी धमक्या देणे असे प्रकार करू लागले आहेत. 


Rate Card









ग्रामीण भागात अशा खासगी सावकारांकडून त्वरीत कर्ज मिळत असल्याने अनेकजन अशा खासगी सावकारांचे शिकार झाले आहेत. परंतु सावकार हे गावातीलच प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने व ते सोबत गुंड लोक पाळून असल्याने कर्जदार लोक हे निमुटपणे या खासगी सावकारांचा व त्यांच्या गावगुंडाकडून होणारा त्रास सहन करित आहेत. 


   

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.