रिपाइंचे जगजागृत्ती अभियान सुरू

0जत,प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिसाच्या जनजागृत्ती अभियान व जिल्हा मेळावा नियोजन दौऱ्यास शनिवार पासून जत येथून सुरूवात झाली.सकाळी जत व सांयकाळी कवटेमहांकाळ येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कोळीगिरीचे रहिवाशी बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त शाखाधिकारी विलास आप्पा बाबर यांनी रिपाइंत प्रवेश केला.जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी त्यांचा भव्य सत्कार करत त्यांना प्रवेश दिला.
पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉ. रवीकुमार गवई, मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष युवा आघाडी नंदकुमार कांबळे, जत तालुका अध्यक्ष युवा आघाडी संमेक कामत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छायाताई सरोदे,मिरज तालुका उपाध्यक्ष संतोष सरवदे, सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, रामकृष्ण गंगणे, रमेश साबळे,जत तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे, युवा कार्यकर्ते अंजली अशोक कांबळे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Rate Cardयावेळी बोलताना विलास बाबर म्हणाले,रिपाइंच्या शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचाराने जतसह जिल्हात रिपाइंचे संघटन वाढविण्यासाठी उर्वरित आयुष्य घालवू.जत येथे महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी विलास बाबर यांचे रिपाइंत स्वागत करताना जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,विकास साबळे

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.