करजगी,वार्ताहर : जत तालुक्यातील विविध गावातील विकास कामाचे शुभारंभ आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. खंडनाळ,येथे लक्ष्मी देवालयासमोर सभागृह बांधणे, करेवाडी (को.बो.)अंतर्गत पेव्हींग ब्लॉक,गिरगाव येथील जोतिबा मंदिर समोर सभामंडप,भोपते वस्ती रस्ता मुरुमीकरण करजगी येथे नूतन ग्रामपंचायत इमारत बांधकाम,बेळोडगी येथे अंतर्गत पेव्हींग ब्लॉक,उमदी येथे आशीर्वाद बियर बार जवळील रस्ता डांबरीकरण करणे,स्मशानभूमी सुशोभीकरण, उटगी येथे अंबाबाई मंदिरानजिक मोकळ्या जागेत कम्पाऊंड बांधणे आदी कामे सोमवारी सुरू करण्यात आली आहेत.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष
आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,माजी पं.स.सदस्य पिराप्पा माळी,संख तहसीलदार श्री.म्हेत्रे ,शाखा अभियंता श्री.शेख,जालिंदर व्हनमाने,सर्व गावातील संरपच,स्थानिक पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
करजगी ता.जत येथे ग्रामपंचायत इमारत कामाचा शुभारंभ करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर







