सरसकट हेक्टरी 25 हजार मदत द्या ; राजू शेट्टी | जतच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीप्रंसगी मागणी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अचनकहळ्ळी गावातील शेतकरी विनायक शिंदे यांच्या घरी माजी खा.राजू शेट्टी,जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी भेट घेत कुंटुबियाचे सांत्वन केले.शिंदे यांचे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आलेल्या ओढ्याच्या पुरात दोन बैल वाहून गेले आहेत.



त्यापार्श्वभूमीवर खा.शेट्टी व खराडे जत दौऱ्यावर आले होते.यावेळी पशुधन आणि शेतकरी वाचविण्यासाठी सरकारने तिजोरी उघडी करावी,अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.राजू शेट्टी महेश खराडे यांनी रविवारी अवकाळीने नुकसान झालेल्या तासगाव कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील शेतीची पाहणी केली.जत तालुक्यातील डफळापूर अचनकहळ्ळी येथील शेतीची पाहणी त्यानंतर त्यांनी शिंदे कुटुबिंयाची भेट घेवून त्यांना दिलासा दिला.



यावेळी शेट्टी म्हणाले,अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे.त्याशिवाय पशुधन आणि मनुष्यहानी झाली आहे.कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला होता.आता पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.पंचनाम्याचा बागुलबुवा न करता सरसकट हेक्टरी तातडीने 25 हजार मदत द्यावी.नंतर अन्य मदत द्यावी,पण आता तातडीने त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत.सद्या केंद्र सरकार मदत देताना पक्षपाती धोरण घेत आहे.राष्ट्रीय आपत्ती निधीतून केवळ त्यांची सत्ता ज्या राज्यात आहे.



Rate Card

त्यांना तातडीने निधी दिला जातो. मात्र,अन्य राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते.शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.यावेळी विनायक माळी व अधिक माळी यांनी पुरात बैल गाडी कशी वाहून गेली,कसेबसे आम्ही कसे वाचलो यांची कहाणी सांगितली. उपस्थित सर्वाच्याच डोळ्यात पाणी तरळले याप्रसंगी तुकाराम बाबा महाराज रमेश माळी,आबा गावडे,पिंटू मोरे,शहाजी साळे,सुधीर माळी,भैरव माळी,शिवाजी पाटील,दामाजी दुबळ,सूरज पाटील,महेश जगताप,निखिल कारंडे,मारुती देवकर, सुरेश पाचिब्रे आदीसह शेतकरी उपस्थित होते.



अचनकहळ्ळी ता.जत येथील माळी कुटुबिंयाशी संवाद साधताना राजू शेट्टी, बाजूस महेश खराडे,तुकाराम महाराज

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.