संख मध्यम प्रकल्प जाँकवेलातून पाणी गळती | 25 वर्षात जाँकवेलची दुरुस्तीच नाही ; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

0संख,वार्ताहर : जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पाच्या जाँकवेलमधून पाणी गळती पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने सुरु आहे.प्रकल्पाचे बांधकाम झाल्यापासून गेली 25 वर्षात जाँकवेलची लिंक दुरुस्ती केली गेली नसल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्प 1995 मध्ये झाला.मुसळधार पावसाने प्रकल्प 11 वर्षानंतर तुडुंब भरला आहे.जिल्ह्यात साठवण क्षमतेने दुस-या क्रमांकाचे मध्यम प्रकल्प आहे.साठवण क्षमता 703 द.घ.ल.फू आहे.ओलिताखाली येणारे क्षेत्र 3 हजार 200 हेक्टर आहे.मध्यम प्रकल्पातून डावा व उजवा कालवा काढण्यात आला आहे.त्यामध्ये उजवा कालवा दीड कि.मी व डावा कालवा 32 कि.मी आहे.दोन्ही कालव्यातील जाँकवेलमधून गळती सुरु आहे.पावसाळ्यापूर्वी मध्यम प्रकल्पाचा पाहणी अहवाल तयार केला जातो.पण दरवर्षी मध्यम प्रकल्पाची पाहणी न करताच कार्यालयात बसून तयार केला जातो.त्यामुळे वस्तुस्थिती समजत नाही.जॅकवेल दरवर्षी पाण्याने गंजलेला असतो.त्याची सर्व्हेसिंग,लिंक दुरुस्ती होणे आवश्यक असते.पण ते केले जात नाही.त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.प्रकल्पातील पाणी जास्त दिवस टिकून राहिल.ही अपेक्षा शेतकरी बाळगून होता. परंतु पाणी गळतीमुळे कोट्यवधी लीटर पाणी वाया जाणार आहे.पाटबंधारे विभागाने सिमेंट,वाळूची पोती टाकून तात्पुरती मलम पट्टी केली आहे.पाणी संपेपर्यंत गळती थांबविता येत नाही.आ.विक्रम सावंत यांनी संख मध्यम प्रकल्पाला आँगस्ट महिन्यात भेट दिली होती. त्यावेळी जाँकवेलची लिंक दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.त्याला पाटबंधारे विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

Rate Cardवास्तव्याचा बोजवारा 


शाखा अभियंता संजय मोरे यांची नेमणूक संख पाटबंधारे कार्यलयात नेमणूक आहे.हंगामी पदभार जत पाटबंधारे कार्यलयाचा आहे. नेमणूकीच्या ठिकाणी येत नाहीत.वास्तव्य करीत नाहीत.

“जाँकवेल गळतीसाठी सिमेंट,वाळूची पोती टाकून गळती थांबवली आहे.यांत्रिकी विभागाकडून दुरुस्तीसाठी पैसे मंजूर झाले आहेत.लवकरच आम्ही लिंक दुरुस्ती करुन गळती थांबविणार आहे.”


व्ही.ए.मुंजाप्पा

उपअभियंता,

जलसंपदा विभाग.


संख मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातील जाँकवेलमधून पाणी गळती सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.