सांगली : सांगली जिल्ह्यात चार महिन्यानंतर प्रथमच रूग्णसंख्या वाढीचा दर अत्यंत कमी झाला आहे. रविवारी जिल्ह्यात अवघे 126 रूग्ण वाढले आहेत. तर त्याच्या तिप्पट 429 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शिराळा तालुक्यात रविवारी एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही.
ही जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासा मिळाला आहे.उपचार सुरू असताना आठ
जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 576 रूग्णांचा बळी गेला आहे.मनपा क्षेत्रात फक्त 27 महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढीचा दर घटला आहे. गेल्या चार महिन्यानंतर प्रथमच महापालिका क्षेत्रात इतक्या कमी संख्येने आढळून आले आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे.
सांगली शहरात अवघे 18 नवीन रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात नऊ रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 762 रूग्ण झाले आहेत. त्यातील 88 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.ग्रामीण भागात अवघे 99 रूग्ण वाढले ग्रामीण भागात प्रथमच 100 पेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यात चार महिन्यानंतर प्रथमच एकही नवीन रूग्ण वाढला नाही.आटपाडी तालुक्यात 19 रूग्ण जत तालुक्यात अवघे सहा रूग्ण वाढले आहेत.
तासगाव तालुक्यात नऊ तर कवटेमहांकाळ तालुक्यात फक्त चार रूग्ण वाढले आहेत.दरम्यान जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या दहाच्या आत आली आहे. तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे.रवीवारी जत 2,उमदी 1,टोणेवाडी 2,घोलेश्वर 3,डफळापूर 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज तालुक्यात 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत.









