करजगी,वार्ताहर : भिवर्गी ते करजगी मार्गावरून दुधाची वाहतूक करत असलेला ट्रँक्टर पलटी झाल्याने सनमडी येथील एकजण वाहून गेल्याची घटना सोमवार ता.15 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.पिंटू भिमू धायगोेंडे(वय 32,रा.सनमडी)असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव आहे.
जत तालुक्यात गेल्या चार दिवसापासून तुफान पाऊस पडत आहे.त्यामुळे सर्व नद्या,ओढे दुतोंडी भरून वाहत आहे.
पुर्व भागातील संख प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने तलावाखाली वाहणाऱ्या बोर नदीला पूर आला आहे. दरम्यान भिवर्गी-करजगी मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने भिवर्गी रोडवरील चेन्नई डेअरीचे संकलन होणारे दुध गुरूवारी सकाळी करजगीतून टेम्पो ऐवजी ट्रँक्टरमधून नेहण्यात येत होते.सुमारे वीस कँन दुध भरून ट्रक्टरच्या दोन खेपा करण्यात आल्या होत्या तिसऱ्या खेपेला अचानक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रँक्टर वाहून नदीपात्र कोसळला.दोघेजण पाण्यात वाहू लागले.जवळच्या काही लोंकानी एकाला वाचविले.मात्र अन्य एकजण वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.दरम्यान वाहून गेलेल्याचा शोध सुरू आहे.









