जत तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर ! | जनजीवन विस्कळीत,द्राक्ष,डांळिब बांगाना फटका

0

जत,प्रतिनिधी : गेल्या चार दिवसांपासून 

तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यावेळी ग्रामीण भागासह जत शहरांही याचा मोठा फटका बसला आहे.अगदी तालुकाभर चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.बुधवारी सुर्यदर्शनही झालेले नाही.रात्री उशिरापर्यत संततधार सुरूच आहे.






शहरातल्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही शिरले आहे.अनेक तलाव भरल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत.शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.






गेल्या चार दिवसांपासून जत तालुक्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.जत शहरात सकाळपासून धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलं आहे, तर रस्ते जलमय बनले आहेत.तालुक्यात इतर ठिकाणीही दमदार पावसाची हजेरी सुरू आहे.शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





जत पुर्व भागातील जवळपास सर्वच तलाव भरले आहेत.सर्वात मोठा संखचा मध्यम प्रकल्पाच्या साडव्यावरून पाणी मोठ्या वेगाने बोर नदीतून पुढे जात असल्याने सुसलाद,सोनलगीपर्यतचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.संख-विजापूर,संख- अंकलगी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे.उमदी परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपले आहे. जाडरबोबलाद, सोन्याळ,येळवी,आंवढी लोहगाव,बेवनूरपर्यत,बिळूर उमराणी,डफळापूर, शेगाव,कुंभारीपर्यत दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे.जत तालुक्यात गेल्या दहा वर्षातील रेकार्ड ब्रेक पाऊस झाला आहे. तालुक्यातील जवळपास सर्व तलाव भरले आहेत.पुढील दोन वर्ष पिण्याच्या पाण्यासह शेतीचा पाणी प्रश्न यामुळे सुटला आहे.






रब्बीची पेरणी खोंळबळी


दसऱ्याच्या आसपास सुरू होणारी रब्बी हंगामातील ज्वारीसह,मका पिकांची पेरणी खोंळबळी आहे.गेल्या चार दिवसातील तूफान पावसामुळे अनेक शेतांना पाणी लागले आहे.पुढे पंधरा दिवस शेतीकामे करणे शक्य नाही.




Rate Card



द्राक्ष,डांळिब बागांना फटका


तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष,डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे.ऑक्टोंबर फळछाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहेत.पुढे छाटणी घेणे अशक्य होऊन बसले आहे.दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्यामुळे काडीतून बाहेर पडलेले द्राक्ष घड,डांळिब कुचत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी होत आहे.





कोसारी,गुळवंचीतील घराची पडझड

येळवी,वार्ताहर : जत तालुक्यातील कोसारी,गुळवंचीतील परिसरात परतीच्या संततधार पावसाने

घराची पडझड झाले आहे.त्याशिवाय तालुक्यातील पुर्व भागातील संख-अंकलगी,संख-विजापूर,बेळोंडगी,बालगाव हळ्ळीनजिकचे रस्ते,खैराव- टोणेवाडी,येळवी-हंगिरगे,खैराव लोणार,खैराव-हुनूर रस्ते बंद झाल्याने सांगोला,मंगळवेढा,विजापूर चा संपर्क तुटला आहे.

कोसारीतील तानाजी माळी व

गुळवंची येथील श्रींकात विष्णू रुपनूर यांचे राहते घर पडले आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुढील दोन दिवस तालुक्यात अतिवृष्ठी होण्याचा वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे.त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने दिला आहे.




बोर नदीपात्र,संख तलाव परिसरात जाऊ नये : मंगलताई पाटील

संख,वार्ताहर : संख ता.जत लगतच्या बोर नदीला मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने नदीत पोहणे,कपडे धुण्यासाठी जाऊ नये,असे आवाहन संरपच मंगलताई पाटील यांनी केले आहे.

सध्या संखसह दरिबडची,तिकोंडी,जालीहाळ सह बोर नदीच्या लाभ क्षेत्रात तूफान पाऊस पडत असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे मोठ्या गतीने पाण्याचा प्रवाह वाहत आहे.त्यामुळे मोठ्या धोका आहे.त्याशिवाय संख मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तलाव व ओढा पात्र परिसरात नागरिक,लहान मुलांनी जाण्याचे धाडस करू नये,महिलांनीही कपडे धुण्यासाठी ओढापात्रात कोणत्याही परिस्थिती जाऊ नये असे आवाहन पाटील यांनी दिले आहे.तशी दंवडीही गावात दिली आहे. कोणतीही अडचणीची परिस्थिती उद्भवल्यास ग्रामपंचायतीला संपर्क करावा,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.





पुर्व भागातील सर्वात मोठ्या संख प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.