संख,वार्ताहर : संख ता.जत लगतच्या बोर नदीला मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने नदीत पोहणे,कपडे धुण्यासाठी जाऊ नये,असे आवाहन संरपच मंगलताई पाटील यांनी केले आहे.
सध्या संखसह दरिबडची,तिकोंडी,जालीहाळ सह बोर नदीच्या लाभ क्षेत्रात तूफान पाऊस पडत असल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे मोठ्या गतीने पाण्याचा प्रवाह वाहत आहे.त्यामुळे मोठ्या धोका आहे.त्याशिवाय संख मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तलाव व ओढा पात्र परिसरात नागरिक,लहान मुलांनी जाण्याचे धाडस करू नये,
महिलांनीही कपडे धुण्यासाठी ओढापात्रात कोणत्याही परिस्थिती जाऊ नये असे आवाहन पाटील यांनी दिले आहे.तशी दंवडीही गावात दिली आहे. कोणतीही अडचणीची परिस्थिती उद्भवल्यास ग्रामपंचायतीला संपर्क करावा,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






