आंवढीच्या संरपचांनी वाचविला,ओढ्यात अडकलेल्या चालकाचा जीव

0आंवढी,वार्ताहर : जीव धोक्यात घालून दुतोंडी भरून वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्यात उतरत छोटा हत्ती टेम्पो सह आडकलेल्या एका युवकाला काढत

त्यांचा जीव वाचविण्याचे काम देवदूत म्हणून आलेल्या संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष,तथा आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांनी माणूसकीचे दर्शन घडविले आहे.

त्याचे झाले असे,संरपच कोडग व त्याचे काही सहकारी आण्णासाहेब गणपती बाबर,उपसंरपच आण्णासाहेब बाबर,विनोद कोडग हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते.गेल्या तीन दिवसातील संततधार पावसामुळे महूद गावाजवळील ओढा पात्रात पाणी पुलावरून वाहत होते.दोन्ही बाजूला वाहने थांबून होते.अशा स्थितीतही वेळापूर येथील एक छोटा टेम्पो युवा चालकाने पुलावरून वाहन नेहण्याचे धाडस केले होते.
Rate Cardत्याचे धाडस जीवघेणे ठरले.पुलावर पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने छोटा हत्ती टेम्पो पाण्यात अडकला.जीवांताच्या आंकाताने तो चालक दोन तास आरडाओरडा सुरू करत होता,मात्र मोठ्या प्रमाणात असल्याने कुणीही पाण्यात जाण्याचा धाडस केले नाही.दरम्यान पुण्याहून आलेले संरपच आण्णासाहेब कोडग व त्यांच्या मित्रांनी कोणताही विचार न करता जवळचे काही लोक,अन्य वाहन चालकांच्या मदतीने जीव धोक्यात घालत पाण्यात उतरले.


टेम्पोपर्यत दोरी पोहचवत दोरीने ओढत टेम्पो चालकाला व टेम्पोही पाण्याबाहेर काढत युवक चालकांला वाचवत जीवदान दिले.जीव धोक्यात घालून माणूसकी जपण्याचे काम संरपच आण्णासाहेब कोडग व त्यांच्या मित्रांनी केले आहे.


वेळापूर येथील वाचविलेल्या युवकासह संरपच आण्णासाहेब कोडग व त्यांचे मित्र

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.