जत,प्रतिनिधी : बेवनूर(ता.जत)येथील शेतकरी बाजीराव नारायण शिंदे(वय 62) यांचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला.ही घटना रविवार दि.11 रोजी दुपारी पाचच्या दरम्यान घडली असून याबाबतचा पंचनामा महसूल अधिकऱ्यांनी केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,बेवनूर येथील मयत बाजीराव शिंदे यांचे घर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे.ते शेळ्या चरण्यासाठी शेतात गेले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊसास सुरुवात झाली. दरम्यान शेळ्या घरी गोठ्याकडे घेऊन येताना वीज शिंदे यांच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.







