जत पूर्व भागात तूफान पाऊस

0

संख,वार्ताहर : जत पूर्व भागातील रविवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले.बंधारे, तलाव,ओढे-नाले भरुन वाहत आहेत.पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सोन्याळ, जाडरबोबलाद,उटगी परिसरात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही.येथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.


पूर्व भागातील मुचंडी,रावळगुंडवाडी,देवनाळ,मेंढीगिरी,

दरीकोणूर,सोरडी,शेड्याळ,उंटवाडी,वळसंग,अमृतवाडी,पाच्छापूर या भागात रविवारी रात्री चार तास पाऊस पडला.यामुळे परिसरातील ओढे, बंधारे भरुन वाहू लागले आहेत.मुचंडी-दरीबडची रस्त्यावरील सावळ ओढावरील पुलावरुन पाणी धोक्याची पातळीवरुन वाहत असल्याने रविवारी रात्री वाहतूक बंद होती.ही वाहतूक वळसंग, शेड्याळ मार्गे सुरु होती.सकाळी वाहतूक सुरु झाली.ढगफुटीसदृश्य पावसाने सर्वत्र पाणीच झाले आहे.सोरडी,सिध्दनाथ तलाव तुडंबू भरुन वाहू लागला आहे. 

सिध्दनाथ तलाव रात्रीत भरला आहे..संख मध्यम प्रकल्प, दरीबडची साठवण तलावाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. बोर नदी पात्रातील जालिहाळ खुर्द,दरीबडची, पांढरेवाडी,खंडनाळ येथील ओढापात्रातील कोल्हापूर बंधारे भरले आहेत.पाणी पुलावरुन वाहत असल्याने संख- विजापूर,संख-अंकलगी,संख-गुड्डापूर,दरीबडची-सोरडी,दरीबडची-आसंगी(जत) या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती.२५ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.पाऊस खरीप हंगामातील पिकांना मारक ठरला आहे. बाजरी,मका,उडीद, सोयाबीन, तूर,सुर्यफुल, मूग,मटकी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही पिकांची काढणी झाली आहे.पिके रानातच कुजणार आहेत.सध्या या पिकात पाणी साठले आहे.रानात ओल असल्याने काढणी थांबणार आहे.


Rate Card
डाळिंब बागांचे नुकसान;सध्या या मुसळधार पावसाने डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.परिपक्व बागेतील फळे फुटणार आहेत.बागेत पाणी थांबल्याने फळ गळती होणार आहे.

रब्बी पिकांना फायदा ;दमदार पाऊस झाल्याने विहीरी,कूपनलिका,ओढे,बंधारे,तलावांना पाणी झाले आहे.रब्बी हंगामातील ज्वारी, भूईमूग तसेच भाजीपाला आदी चांगली आर्थिक उत्पन्न देणारी नगदी पिके घेता येणार आहेत.द्राक्षे फळबागांना फायदा होणार आहे.संख ता.जत परिसरात झालेल्या पावसाने बोर नदी दुतोंडी भरून वाहत आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.