जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या सभापती तथा दलित पँथरचे संस्थापक भूपेंद्र कांबळे गाडी बोरगाव नजिक असणाऱ्या अग्रणी नदी पात्रात वाहून गेली.सुदैवाने पुलावरील कठड्याला गाडी अडकून राहिल्याने गाडीतील सभापती कांबळेसह आठ जण बालबाल बचावले आहेत.मात्र एकजण पाण्यात वाहून गेला आहे.दत्तात्रय प्रेमचंद साबळे असे वाहून गेलेल्या तरूणाचे नाव असून त्यांचा शोध सुरू आहे.
जत नगरपरिषदेचे सभापती कांबळे हे कोल्हापुर येथे लग्न समारंभासाठी गेले होते.परत येताना मोरगाव -कवटेमहांकाळ रस्त्यावरील अग्रणी नदीच्या पुरात कांबळे यांची झायलो गाडीच्या चालकाला अंदाज न आल्याने गाडी पुलावरून गाडी वाहू लागली सुदैवाने गाडी पुलावरील कठड्याला अडकून राहिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच शेजारचे नागरिक व पोलीसांनी दोरीच्या साह्याने त्यांना पाण्याबाहेर काढले.मात्र दत्तात्रय प्रेमचंद साबळे हा तरूण दोरीचा हात सुटल्याने वाहून गेला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.