कंठी खून प्रकरणातील संशयित तिघे जेरबंद | मंगळवेढा तालुक्यातील हुंलजतीतून घेतले ताब्यात

0जत,प्रतिनिधी : कंठी ता.जत येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोटे यांच्या खून प्रकरणातील फरारी संशयित तिघांना स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागाच्या पथकांने (हुजलंजी ता.मंगळवेढा जि.सोलापूर)येथून ताब्यात घेतले.गोविंद नागेश लांडगे(वय 21),मुरलीधर मधूकर वाघमारे(वय 36),श्रीधर मधूकर वाघमारे (वय 41,सर्वजण रा.कंठी)अशी अटक केलेल्या तिंघाची नावे आहे.तिंघानी मोटेचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.कंठी येथील सराईत गुन्हेगार धनाजी मोटे यांचा ता.8 ऑक्टोंबरला मध्यरात्री कंठीतील मरगूबाई मंदिरासमोर दगडाने ठेचून खून केला होता.मोटे यांचे गावातील एका मुलीशी असलेल्या अनैतिक संबधातून हा खून झाल्याचे समोर आले होते.याप्रकरणी घटनेच्या दुसऱ्या दिवशी नागा उर्फ नागेश भिमराव लांडगे(वय 55,रा.कंठी) याला ताब्यात घेतले होते.उर्वरित तिघाच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास शोध घेत असताना संशयित तिघे हुलजंती ता.मंगळवेढा येथे हुलजंती ते माळेवाडी जाणाऱ्या रोडवरच्या पाण्याच्या टाकीजवळ असले बाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता,त्यांनी मोटे यांचा खून केल्याची कबूली दिली आहे.संशयित तिघांना पुढील तपासासाठी जत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.Rate Card
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम,मनिषा दुबुले यांच्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार जितेंद्र जाधव, राजाराम मुळे, राजू शिरोळकर, संदीप गुरव, संदीप पाटील, आमसिध्द खोत, संदीप नलवडे, अनिल कोळेकर, चा.शंकर पाटील ,अरुण सोकटे यांनी पार पाडली.

कंठी ता.जत येथील धनाजी मोटे खून प्रकरणातील आरोपीसह पोलीस पथक

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.