जत,प्रतिनिधी : कोरोनामुळे अडचणीत आलेल्या मराठी चित्रपट कलाकारांना मानधन द्यावे व साठ वर्षावरील कलाकारांना पेन्शन द्यावी,अशी मागणी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केली आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूर येथील कार्यालयांमध्ये महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांचे हस्ते चित्र शारदा या अंकाचे वितरण संभारभा प्रंसगी पंतगे यांनी तसे निवेदन दिले.यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, शरद चव्हाण संचालक रणजीत जाधव,बोरगावकर सचिव रवि गावडे उपस्थित होते.







