जत,प्रतिनिधी : हाथरस प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी,हा खटला फास्ट ट्रँक न्यायालयात चालवावा अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि,उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील एका मुलीवर बलात्कार करून तिला गंभीर मारहाण करून खून केला आहे. यात कुंटुबियांना न्याय देण्याऐवजी उत्तरप्रदेश प्रशासनाने मृत्तदेहाची विल्हेवाट लावली आहे.या पोलीसाची चौकशी करून कारवाई व्हावी.थैरलांजी प्रकरणातील आरोपी मोकाट सुटले आहेत.
अत्याचार पिडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी अँट्रासिटी अँक्टचे खटले फास्ट ट्रक न्यायालयात चालवावेत.पिडित कुंटुंबियाचे पुर्नवसन करावे.सुधारित अँट्रासिटी अँक्टच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेचा रिपाईच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,नारायण कामत,संजय एम कांबळे,राहुल वाघमारे,विनोद कांबळे,राहुल चंदनशिवे,नितिन शिंदे,अर्जुन कांबळे,अविनाश वसमाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करावी या मागणीचे निवेदन देताना रिपाईचे पदाधिकारी








