संभाजी बिग्रेडच्या तक्रारीची दखल | बेवनूर-जूनोनी रस्त्याची दुरूस्ती ; अपघातातील मदत अद्याप नाही
जत,प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेड सांगलीच्या तक्रारीमुळे सार्वजिक बांधकाम विभागाची दिलीप बिल्डकॉन कंपनीला नोटीस काढली असून कंपनीकडून तात्काळ गतीरोधक काढत खड्डे भरले आहेत.
दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अवजड वाहतूक करणार्या वाहनांमुळे बेवनूर ते जुनोनी हा रस्ता पूर्णपणे खचला आहे.त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
संपूर्ण रस्ता धोकादायक बनला होता.खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात
बेवनूर मधील दादासो शंकर सरगर व वसंत धोंडिराम माने यांचा या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे.दोघांवरही अद्याप उपचार सुरू आहेत.त्याशिवाय अन्य छोटे-मोठे अपघात झाले आहेत.यामुळे संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश शंकर नाईक यांनी दि 29 नोंव्हेबरला तक्रार केली होती.
हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करून संबधित कंपनीवर कारवाई करत अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयाचा खर्च द्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक विभाग सांगोला विभागाकडून संबधित दिलीप बिल्डकॉन कंपनीला नोटीस काढत रस्त्यावरील गतीरोधकसह खड्डे भरावेत,अपघातातील जखमींचा खर्च कंपनीने द्यावा,असे आदेश दिले आहेत.शिवाय यापुढे रस्ता खराब होणार नाही,यांची खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.दरम्यान नोटीसीची तात्काळ दखल घेत संबधित कंपनीकडून रस्त्यावरील गतीरोधक काढत खड्डे मुजविले आहेत.

रस्ता नादुरूस्त करणाऱ्या कंपनीकडून रस्त्याची सध्यातरी दुरूस्ती करण्यात आली आहे. भविष्यातही रस्त्यावर खड्डे पडून नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.दरम्यान या कंपनीच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दोघांच्या उपचाराचा खर्च कंपनीने द्यावा अभी मागणी आम्ही केली आहे. मात्र अद्याप तशी मदत कंपनीने दिलेला नाही.त्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागू अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही श्रेयस नाईक यांनी दिला आहे.
