हाथरस घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा | जत बसपाच्या वतीने प्रांतांना निवेदन

0



जत,प्रतिनिधी : उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अनुसुचीत जाती समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केलेल्या आरोपींच्यावर कठोर कारवाई होऊन योगी सरकार बरखास्त करावे,अशी मागणी जत बसपच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.



निवेदनात म्हटले आहे की.

उत्तर प्रदेश येथील हाथरस या गावातील एका मुलीवर गावातील तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केली आहे.तसेच जेंव्हा पासून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार बनून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आहेत तेंव्हापासून अनुसुचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गींय समाजावर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत.



जातीवादी मानसिकतेतून त्याठिकाणी कारभार चालला असून मागासवर्गीय लोक दहशतीखाली त्याठिकाणी जगत आहेत.या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या निगराणीखाली सखोल चौकशी होऊन दोषींना 6 महिन्याच्या आत फासावर लटकवावे. कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करुन त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांची मठामध्ये रवानगी करावी अशी मागणी केली आहे.



यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, बी.व्ही.एफ सहसंयोजक मेसाप्पा काटे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card




हाथरस(उत्तरप्रदेश) घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करा,या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.