सोनलगीतील मुलाचा मृत्तदेह 10 तासानंतर सापडला

0उमदी,वार्ताहर : सोनलगी (ता.जत) येथे बोर नदी ओढापात्रात पोहायला गेलेला चौदा वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली आहे. मांतेश विठ्ठल कांबळे (वय-14) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. मित्रासोबत तो सकाळी नदीपात्रात अंगोळीसाठी गेला होता,मात्र त्यास पोहता येत नव्हते.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाळू तस्करांनी पाडलेल्या खड्ड्यात गेल्याने बुडाला.बराच वेळ त्यांचा शोध न लागल्याने काही जणांनी नदीपात्रात शोध घेतला.मात्र नदीत पाणी ज्यादा पाणी असल्यामुळे मृतदेह सापडत नव्हता.
घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे साहेब व त्यांचा पोलिस फौजफाटा दाखल झाले होते.पोलीस प्रशासनाकडून तालुका प्रशासनाला कळविण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ आयुष हेल्पलाईन घटनास्थळी दाखल झाले.तासभराच्या शोध मोहिमेनंतर अखेर अथक प्रयत्नानंतर सायंकाळी बाहेर काढण्यात यश आले. 


Rate Cardआयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार, अमोल व्हटकर,अल्तमेश पट्टनकुडे, मुस्ताक बोरगावकर,नागेश मासाळ यांनी कष्ठ घेतले.उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आले. जालिहाळ बु.येथील राणू चव्हाण याचा भिवर्गी तलावात बुडून मृत्यू झाला आहे.सोनलगीतील ही दुसरी घटना आहे.त्यामुळे बोरनदी काठावरील गावातील पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष ठेवण्याची अत्यंत गरज आहे.
सोनलगीत आयुष हेल्पलाईन टीमकडून शोध मोहिम सुरू होती.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.