जत मधील शासकीय धान्य गोदामात धान्याची चोरी | अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

0
15

जत,प्रतिनिधी : जत शहरातील वायफळ रोडवरील शासकीय धान्य गोदामात 

धान्याची चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.चोरट्यांनी 1850 रुपये किमतीचे धान्य लंपास केले. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की,जत तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानासाठी पुरवठा करणारे धान्य वायफळ रोडवरील शासकीय गोदामात साठविले जाते.तेथून तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानाना धान्याचा पुरवठा केला जातो.जत शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हे गोदाम आहे.या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात होते.मात्र येथील सुरक्षा रक्षक सेवानिवृत्त झाले आहेत.तेथे अद्याप नव्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नाही.



रविवारी सायंकाळी नेहमी प्रमाणे येथील कर्मचारी इस्माईल शेख गोदाम बंद करून गेले.मात्र,या ठिकाणी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील बाजूचे स्वेटर उचकटून गोदामामध्ये प्रवेश केला.50 किलो वजनांची तांदळाची 9 पोती 1350 रुपये किमतीची व 50 किलो वजनांची 5 मक्याची पोती 500 रुपये किमतीची असा 1850 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला.या घटनेची माहिती मिळताच जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.जत पोलीसांनी घटनेचा 

पंचनामा केला.अज्ञात चोरट्याविरोधात 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत.




जत शहरातील गोडाऊन

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here