सांगली जिल्ह्यातील 6 प्रयोगशील शिक्षकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड | सर फाउंडेशनच्या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर | Selection of 6 experimental teachers from Sangli district for National Award Sir Foundation’s National Innovation Competition results announced

0



जत,प्रतिनिधी : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देशभरातील 169 प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील सहा प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.



याबाबत अधिक माहिती देताना सर फाऊंडेशन च्या महिला समन्वयक वासंती कोंदाडे (खेराडकर ) म्हणाल्या की,  महाराष्ट्रासह 16 राज्यातील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांच्यामधून 169 जणांचा यात समावेश आहे. यात प्राथमिक गटात (103), माध्यमिक गटात (22), क्षेत्रीय अधिकारी गटात (13) इतर विभाग (06) यांचा राष्ट्रीय पुरस्कारात समावेश आहे. 



सर फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा 2020’ या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक व शेत्रीय अधिकारी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. नवोपक्रमाचा विषय व परिणामकारकता पाहून तासगांव तालुक्यातील दहिवडी शाळेचे श्री.अजय काळे व बोरगाव शाळेच्या श्रीम.निता घाटगे, कवठेमहांकाळ तालुक्यातील खरशिंग शाळेचे श्री.तारीश आत्तार, कडेगांव तालुक्यातील शिवणी शाळेचे श्री.तानाजी देशमुख व जत तालुक्यातील उमराणी कन्नड शाळेचे श्री.धरेप्पा कट्टीमनी व  बाबरवस्ती (पांडोझरी)शाळेतील श्री. दिलीप वाघमारे या सहा शिक्षकांची  निवड करण्यात आली आहे.




‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली जाते.

Rate Card

सर फाऊंडेशनने शिक्षण विषयक अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रवि जे मथाई सेंटर फॉर एज्यूकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहेत.या पुरस्काराचे वितरण सर फाऊंडेशन, स्टेम व जस्ट लर्निंग कडून डिसेंबर 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘कॉन्फरन्स’ मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 




या ‘एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स 2020’ मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञ व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.या निवडीबद्दल राज्य समन्वयक सर्वश्री सिध्दाराम माशाळे, श्री.बाळासाहेब वाघ व महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे यांनी सर्वाचे अभिनंदन केले.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.