कोविड-19 वैद्यकीय बिलाचा प्रतिपूर्ती आजारामधे समावेश व्हावा

0
5






सोन्याळ,वार्ताहर :”सद्य स्थितीत शासनाव्दारे आयोजीत ” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक गावात, शहरी वस्तीत सर्वेक्षण सुरु आहे.या कामासाठी नियुक्त सर्व शिक्षकांना आरोग्याची हमी म्हणून कोवीड -19 आजाराचा समावेश वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलात करावा,असे निवेदन पुणे विभाग शिक्षक उमेदवार सौ.रेखाताई दिनकर पाटील यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना दिले.



शिक्षकांचे कामकाज लक्षात घेता सर्वेक्षणास कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षण – सेवक ,अंशतः अनुदानित शिक्षकांचे आजारा संदर्भात कोविड -19 च्या अनुषंगाने वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती मिळणे बाबत आग्रही मागणी करणेत आली आहे. शासनाच्या प्रचलीत आजारांच्या यादीत कोवीड -19 आजाराचा तातडीने समावेश करून शिक्षण व शिक्षकांस उचीत न्याय द्यावा अशी आग्रही मागणी पुणे विभाग शिक्षक उमेदवार रेखाताई दिनकर पाटील यांनी केली आहे.याप्रसंगी प्रतिनिधी प्रा. दत्तात्रय गाजरे, अमोल ढेपे, फैय्याज मुलाणी, अन्सार पिरजादे आदि मान्यवर उपस्थित होते .





कोवीड-19 आजाराचा समावेश वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती निवेदन प्रशासनधिकारी हारुण अत्तार यांना देताना सौ पाटील व पदाधिकारी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here