राष्ट्रीय नेत्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करावे ; बसवराज येलगार

0जत,प्रतिनिधी ः संत तुकाराम विद्यालय हिवरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची, जि. प. शाळा हिवरे यांच्या सयुंक्त विद्यमाने म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची ऑनलाईन जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमध्ये शिक्षक संघांचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी विद्यार्थ्यांनी फक्त थोर नेत्यांची जयंती साजरी करण्याबरोबर त्यांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करावे, असे आव्हान केले.कार्यक्रमाची सुरुवात हिवरे  हायस्कूलचे चेअरमन सिद्राम शिंदे यांच्या शुभहस्ते म.गांधी याच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपले मनोगते व्यक्त केली.केंद्र प्रमुख फत्तु नदाफ सर, हिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बाबासो बंडगर, गुळवंची हायस्कूलचे मुख्याध्यापक खुटाळे, बिरनाळ हायस्कूलचे अरुण वाघमारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारसे सर यांनी केले तर सूत्रसंचालन पाटील सर आणि तांबोळी सर यांनी केले.आभार प्रदर्शन बबन पवार यांनी केले. कार्यक्रमांस ज्ञानेश्वर गाडेकर, शंकर वराडे, योगेश पाटील गुरव सर बाबर सर सरगर सर, घोडके मॅडम, चंदू पवार, राजू फोन्डे,यादव, जोतिराम कांबळे, दोन्ही गावातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.

Rate Cardshree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.