करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ गावचे सरपंच साहेबभाषा बिराजदार यांच्याहस्ते करण्यात आला.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गावात घरोघरी जाऊन घरातील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासून आवश्यकतेनुसार औषधे व गोळ्या देण्यात येत आहेत.त्यावेळी ग्रा.प.चे लिपिक साहेबांना डुमणे, शिपाई बसाप्पा हळके, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व स्टॉप व अंगणवाडी कार्यकर्ता व सेविका उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या करजगीत प्रारंभ करण्यात आला.