‘संकल्प से सृष्टी’या उक्तीप्रमाणे आपले विचारच विश्वाची निर्मिती करतात. माणूस जसा विचार करतो तसाच तो घडतो. कोरोनाच्या धकाधकीच्या जीवनात, अस्वस्थ करणार्या स्थितीला स्थिर करण्यासाठी मन शांती असणे आवश्यक आहे.
समाजातील सर्व स्तरात कमालीची भीती ची निर्मिती कोरोनामुळे ढासळलेला आत्मविश्वास जागृत करण्यासाठी घरांमध्ये विविध प्रकारचे प्राणायाम, योगासने ,आनापान हे स्वस्थ आरोग्याचे गुरुमंत्र जोपासणेअत्यंत आवश्यक आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आरोग्य हीच संपत्ती आहे यादृष्टीने प्रत्येकाने नियमित व्यायाम ,प्राणायाम ,आनापान यांचा घरातील सदस्यांमध्ये प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे.
यामुळे मन, शरीर आणि बुद्धीचा विकास होण्यास मदत मिळते. मनाची चंचलता, धावपळ, अस्वस्थता ही केवळ ध्यानधारणा सुविचार प्राणायाम आनापान यांनी दूर होऊ शकते. एकाग्रता टिकविण्याचे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. सामाजिक ,बौद्धिक, मानसिक विकास साधण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. सध्या शासनाने शिक्षण विभागावर लक्ष केंद्रित करून मित्र उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीकरिता उपयुक्त असा मित्र उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला आहे.
मित्र उपक्रमांतर्गत 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 9 दरम्यान 2 तासांचे ऑनलाइन पद्धतीने युट्युब द्वारे आनापान साधना चे प्रशिक्षण इगतपुरी यांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात झाले आहे. कार्यक्षमता, कार्यशक्ती, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, संस्कार, निर्भयता या गुणांचा मानवामध्ये निश्चित बदल घडून येण्यास फलदायी प्रशिक्षण आहे. विद्यार्थी शिक्षक पालक यां प्रशिक्षणामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.योगगुरू रामदेव बाबांच्या रूपाने संपूर्ण जगात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
याचे महत्त्व संपूर्ण जगाला ज्ञात आहे. स्वास्थ्य राष्ट्र आणि स्वास्थ्य आरोग्य जपून देश एका प्रगत, बलशाली सुदृढ,बनण्याकडे आपण प्रयास केला पाहिजे. भारत हा युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांनी आपल्या स्वास्थ्याचा उपयोग राष्ट्रीय संवर्धनासाठी करावा. आनापान ,प्राणायाम, योगा हे मुक्त नैसर्गिक वातावरणात आरोग्यास उपलब्ध करून देणारे टॉनिक आहे.
कांबळे चंद्रकांत हरिबा, उस्मानाबाद मो.7038269331