अखेर जत-कोकळे रस्त्याचे काम होणार

0
16



जत,प्रतिनिधी : सर्वाधिक खड्डेमय झालेल्या जत-सांगली रस्त्याचे कोकळे पर्यत खड्डे दुरूस्ती,व डांबरीकरणाचे काम तातडीने होणार आहे, तसे आदेश आमदार विक्रमसिंह सांवत यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.जत तालुक्यातील खड्डेमय रस्ते,रखडलेली कामे,व नवी कामे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला.





 शहरातील विजापूर-गुहागर रस्ताचे काम महिन्याभरात करण्याच्या सुचना दिल्या.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे झाली आहेत.त्यातील बंहुताश रस्त्यावर खड्डे पडल्याच्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत.यापुढे रस्ते शास्ञशुध्द पध्दत,व दर्जेदार करण्यात यावेत,कोणताही रस्ता उखडू नये यांची खबरदारी संबधित अधिकारी व ठेकेदारांनी घ्यावी.



 निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे,असेही आ.सांवत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले.

यापुढे रस्ते काम करताना शासनाचे नियम पाळावेत,कोणत्याही प्रकार दर्जा घसरल्यास अशा ठेकेदारावर व त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला कळवू,असा इशाराही आ.सांवत यांनी दिला आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here