जत,प्रतिनिधी : करजगी (ता.जत)येथील सरकार मान्य स्वस्तधान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून दुकानदार अशोक रेवणसिध्द् जेऊर यांचेवर कारवाई करावी अशी मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांत,तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे,करजगी येथील स्वस्तधान्य दुकानदाराकडून गरीब कार्डधारकांना लुटण्याचा उद्योग सुरू आहे.धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देतात.
धान्य् कमी का दिले याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलतात.तसेच शिवीगाळ व दमदाटी करतात व माझे विरुध्द कोठेही तक्रार करा असे म्हणून धमकी देत आहेत. शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ,डाळी या व्यक्तीरिक्त इतर लोकल मार्केट मधील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल,कपड्याचे साबण,अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य वस्तू सक्तीने विकत घेतले तरच धान्य देतात,अन्यथा इतर धान्य दिले जात नाही.कोविड काळात आलेल्या धान्य वाटपातही या धान्यदुकानदाराने काळा बाजार केला आहे.
या संदर्भात केलेल्या तक्रारीवरून अप्पर तहसीलचे अधिकारी भडके यांनी या दुकानचा पंचनामा करून सुमारे 56 कार्डधारकांचा जबाब नोंदविला आहे.यात दुकानदाराकडून कशी वागणूक मिळते यांचा पाठा या तक्रारीतून वाचण्यात आला आहे. शासनाच्या नियमाचा भंग करून गरिबाचे धान्य लाटणाऱ्या या धान्यदुकानदाराचा कायमस्वरूपी परवाना रद्द करावा,अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा,बसपचे नेते अतुल कांबळे यांनी दिला आहे.
करजगीचे वादग्रस्त धान्यदुकानदाराचा
परवाना कायमस्वरूपी रद्द करा,या मागणीचे निवेदन देण्यात आले.








