कोरोनातील तेरावा अधिक मास

0अनेकांना प्रश्न पडला असेल की तेरावा महिना म्हणजे धोंड्याचा महिना, अश्र्विन अधिक मास.18 सप्टेंबर पासून प्रत्यक्षात महिन्याचा प्रारंभ झाला आहे. खरेतर महिन्याचा योग म्हणजे वैभव प्रदान करणारा महिना, म्हणजे अधिक मास अशी ओळख. परंतु आपणास विचित्र मासाने ग्रासलेले आहे तो महिना म्हणजे कोरोणातील संकटकालीन अधिक मास. शेतकऱ्यांच्या दुर्दशेचा,रुग्णांच्या परीक्षेचा,शिक्षणाचे 3 तेरा करणारा विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग करणारा. दुष्काळातील तेरावा महिना ही म्हण सर्वांना सर्वश्रुत आहे.याचा अर्थ होतो आधीच संकट त्यात नव्या संकटाची भर पडने.

संकटाचा मुकाबला करावा लागणारा देश, देशात कोरोनांनी पाय विस्तारण्यास सुरुवात केली आहे. सोबत अनेक उपद्रवी संतानाना जन्म दिला आहे.जीवनातील सर्व मार्ग स्तब्ध करून ठेवले आहेत. दुर्धर आजार, बालकांचे सर्वसामान्य आजार, वृद्धांचे होणारे हाल इलाज करण्याची शाश्वती खाजगी रुग्णालयात गंभीरपणे होत नाही. मानवी जीवन अनेक व्याधींनी ग्रासलेले असताना भीती, आणि तणाव प्रतिकारशक्ती कमी करण्यास मदत करत आहेत. खाजगी रुग्णालयात डॉक्टर रुग्णांना जवळ घेण्यात स्वारस्य दाखवत नाहीत. योग्य निदान केले जात नाहीत. प्रसंगी बालके, वृद्धांना ,सामान्य रुग्णाला स्वतः च सामना करावा लागतो. रुग्णांच्या दृष्टीने गंभीर आहे. निदान न होण्यास हे एक सबळ कारण होऊ शकते.

Rate Card
कोरोणाने आपल्या अधिपत्याखाली सर्व रुग्णांना बंदिस्त करून ठेवण्याचा जागतिक विक्रम इतिहासात करून ठेवला आहे. हा कोरोना काळातील रुग्णांच्या दृष्टीने दुष्काळातील कोरोनाचां तेरावा महिना म्हणण्यास वावगे ठरेल. जगाचा अन्नदाता शेतकरी यांना सर्वात मोठा फटका बसला आहे.बळीराजाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. हातच सोडून पळत्याच्या मागे लागण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. हातात आलेलं सोयाबीन, उडीद ,कपास या पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास घेतलाय. शेतकऱ्यांच्या पुढे तसेच समस्यांचा पाढाच दिसून येतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अधिक पर्जन्याचा ओला दुष्काळ कधी कोरोनाचा संघर्ष. आशावादी स्वप्नावर पावसाने वार करून शेतकऱ्यांचे स्वप्न भंग केले. एवढ्या मोठ्या नुकसानीतून शासनाच्या जखम रूपी मलमपट्टीने शेतकरी कसा सावरणार? उदासीन तेतून बाहेर कसा येणार? याचा शासनदरबारी विवेकबुद्धीने विचार करून बळी राजांचा हितकारक निर्णय घ्यावा. दुष्काळग्रस्तांची आर्त हाक ऐकून मदतीचा हात पुढे करावा.


चंद्रकांत कांबळे उमरगा उस्मानाबाद.7038269331

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.